
राज्य सरकारने राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ केले आहे. पण याचा सोयीस्कर अर्थ काढत राज्यातील काही महाविद्यालयांनी मुलींना आधी पैसे भरा, शासनाकडून पैसे आल्यावर परत करू असे सांगून मुलींकडून पैसे वसूल केल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आल्याची कबुली उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे.