ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक चंद्रकांत पाटणकर यांना मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा यंदाचा उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार जाहीर झाला आहे. पाटणकर यांनी गेली 50 वर्षे सातत्याने वृत्तपत्रीय लिखाण करून अनेक समस्यांना वाचा पह्डली आहे. त्यांच्या लिखाणाची दखल घेऊन सरकारने समस्यांची सोडवणूकही केली आहे. वृत्तपत्र लेखक संघाच्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात 6 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण समारंभात चंद्रकांत पाटणकर यांना सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरवण्यात येईल, अशी माहिती मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष संस्थापक एकनाथ बिरवटकर यांनी दिली.