
तुमच्यातला कडवट शिवसैनिक घडला कसा, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला असता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आठवणींना उजाळा दिला. सातवी-आठवीत असतानाच ‘मार्मिक’मुळेच माझ्यातला शिवसैनिक घडत गेला. वृत्तपत्रांमधून शिवसेनाप्रमुखांचे विचार वाचून भारावून गेलो होतो. सन 1978 ला गिरगावात प्रचारासाठी आलो असताना शिवसेनाप्रमुखांचे भाषण ऐकलं. नंतर धावत जाऊनच साष्टांग दंडवत घातले. शिवसेनाप्रमुखांमुळेच आम्ही मोठे झालो. आज पक्ष संकटात असताना खंबीरपणे लढणं हे आमचं कर्तव्यच आहे, अशी भावना व्यक्त केली.