तिरुपती मंदिरातील लाडूत जनावरांची चरबी, चंद्राबाबू नायडू यांचा आरोप

तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी, फिश ऑईल, डुकराची चरबी, बीफ फॅटचे अंश असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. गुजरातमध्ये केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या पशुधन आणि अन्न विश्लेषण तसेच अध्ययन केंद्राच्या प्रयोगशाळेने यासंदर्भातील अहवाल दिला आहे.

चंद्राबाबू यांनी यावरून वायएसआर सरकारवर आरोप केला. त्यानंतर वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेडी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर पलटवार केला. नायडू यांनी तिरुमला मंदिर आणि करोडो हिंदूंच्या श्रद्धेला धक्का देऊन मोठे पाप केल्याचा आरोप त्यांनी केला. चंद्राबाबूंनी तिरुमला प्रसाद यांच्यावर केलेली टिप्पणी अत्यंत निषेधार्ह आहे.