Champions Trophy 2025 – टेम्बा बवुमा करणार दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व, ‘या’ वेगवान गोलंदाजांचे झाले पुनरागमन

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेन आपल्या संघाची घोषणा केली आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी टेम्बा बवुमाची दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदी वर्णी लागली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी सोमवारी (13 जानेवारी 2025) 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. टेम्बा बवुमाच्या नेतृत्वात संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. टेम्बा बवुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेची कामगिरी दमदार राहिली आहे. त्यामुळेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावर संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्किया आणि लुंगी एनगिडी यांची सुद्दा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात निवड करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ 2023 च्या वनडे विश्वचषकाच्या सेमी फायलनमध्ये पोहोचला होता. परंतु सेमी फायनलमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या संघातील 10 खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघामध्ये कायम ठेवण्यात आले आहे. त्याच बरोबर टोनी डी झॉर्झी, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स आणि विआन मुल्डर हे खेळाडू पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतील.

दक्षिण आफ्रिकेचा 15 सदस्यीय संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), मार्को यान्सन, हेनरिक क्लासन, केशव महाराज, टोनी डी झॉर्झी, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ताबरासी ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डर डसेन.