
जगातील आघाडीच्या फलंदाजांचा कर्दनकाळ असलेल्या जसप्रीत बुमराविना हिंदुस्थानी संघाला आपला चॅम्पियन्स ट्रॉफीची मोहीम फत्ते करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीपूर्वी दुखापतग्रस्त झालेला बुमरा गेला दीड महिने मैदानाबाहेर आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघात पुनरागमन करील अशी आशा होती, मात्र आज संघनिवडीचा अखेरचा दिवस असल्यामुळे बीसीसीआयकडून बुमराच्या निवडीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर न आल्यामुळे त्याच्याशिवायच हिंदुस्थानी संघाला दुबईत उतरावे लागणार आहे. येत्या 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफीला प्रारंभ होत असून हिंदुस्थान आपला पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे.