
महाकुंभमेळ्यापासून चर्चेत असलेला आयआयटी बाबा म्हणजेच अभय सिंहने आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यास सुरू असलेल्या उपांत्य सामन्याबाबत भविष्यवाणी केली आहे. याआधी त्याने टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या लढतीबाबतही भविष्यवाणी केली होती. त्यावेळी ती सपशेल चुकची ठरल्याने तो मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता. तरीही आता त्याने पुन्हा एकदा सध्या सुरू असलेल्या उपांत्या समान्याच्या लढतीबाबत भविष्यवाणी केली आहे.
सध्या आयआयटी बाबा जयपूरला असून सध्या सुरु असलेल्या उपांत्य सामन्यात कोण जिंकेल, असं विचारलं असता आयआयटी बाबाने फक्त ऑस्ट्रेलिया असं एका शब्दात उत्तर दिले. त्यानंतर आता सामन्यात काय होईल, ते सर्वांना कळेलच, असेही त्याने म्हटले आहे. याआधी टीम इंडिया- पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यावेळी आयआयटी बाबाने केलेली भविष्यवाणी सपशेल चुकली होती. आताही त्याने केलेल्या भविष्यवाणीची सोशल मिडीयावर पुन्हा एकदा चर्चा होत आहे.