![Champions Trophy](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/11/Champions-Trophy-3-696x447.jpg)
चॅम्पियन्स ट्रॉफीचा रणसंग्राम 19 फेब्रुवारी पासून पाकिस्तानात सुरू होणार आहे. परंतु टीम इंडियाचे सर्व सामने दुबईमध्ये होणार आहेत. अवघ्या काही दिवसांनी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. अशातच ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बक्षिसाची रक्कम घोषित केली आहे. विशेष म्हणजे बक्षिसाच्या रकमेत मागच्या स्पर्धेच्या तुलनेत 53 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता विजेत्या संघाला 2.4 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 19.5 कोटी रुपये मिळणार आहेत.
ICC ने जाहीर केलेल्या बक्षीस रकमेनुसार, उपविजेत्या संघाला 1.12 मिलीयन डॉलर (9.72 कोटी रुपये), सेमी फायनलमध्ये पराभुत होणाऱ्या दोन्ही संघांना 56 हजार डॉलल (4.86 कोटी रुपये) मिळणार आहेत. त्याचबरोबर साखळी फेरीत विजयी होणाऱ्या संघांना 34 हजार डॉलर (30 लाख रुपये), पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असणाऱ्या संघांना 3 लाख 50 हजार डॉलर (तीन कोटी रुपये), सातव्या आणि आठव्या स्थानावर असणाऱ्या संघांना 1 लाख 40 हजार डॉलर (1.2 कोटी रुपये) मिळणार आहेत. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व आठ संघांना 1 लाख 25 हजार डॉलर म्हणजेच 1.08 कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे. यावर्षी स्पर्धेची एकूण रक्कम 6.9 मिलियन डॉलर म्हणजचे 60 कोटी रुपये इतकी आहे.
टीम इंडियाचा समावेश ग्रुप ए मध्ये करण्यात आला असून पहिला सामना दुबईमध्ये 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारी पाकिस्तान आणि 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया भिडेल.