
मुंबईकरांची ग्रामदेवता असलेल्या मुंबादेवी मंदिरात 30 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत चैत्र नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवा दरम्यान सकाळी 5.30 ते रात्री 10 या वेळेत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहील.
30 मार्चला गुढीपाडव्याला चैत्र नवरात्र उत्सवाला प्रारंभ होईल. या दिवशी सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी घटस्थापना होईल. 2 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता दीपोत्सव तर 5 एप्रिल रोजी दुर्गाष्टमी होईल. 6 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता श्री राम नवमी हवन – श्री नवचंडी महायज्ञ होणार आहे. नवरात्रीच्या कालावधीत पहाटे 5.30 वाजता मंगल आरती, सकाळी 9.30 वाजता मुख्य आरती, सकाळी 11.30 वाजता नैवैद्य आरती, सायंकाळी 6.30 वाजता धूप आरती, रात्री 8 वाजता मुख्य आरती तर रात्री 9.45 वाजता शयन आरती होईल. तसेच 10 एप्रिल रोजी महावीर जयंती होणार आहे. 12 एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त सकाळी 6 वाजता हवन तर सकाळी 9.15 वाजता पुर्णाहूती होईल. पौर्णिमा श्री नवचंडी यज्ञ याच दिवशी होईल, अशी माहिती श्री मुंबादेवी मंदिर विश्वस्त निधी यांच्यावतीने देण्यात आली आहे.