‘तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे’; मंत्रिपदाबाबत भुजबळांचा सूचक टोला

मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याने नाराज असणारे माजी मंत्री छगन भुजबळ गुरुवारी पत्रकारांपुढे व्यक्त झाले. ‘कोणाचे मंत्रिपद काढून ते मला द्यावे’, अशी माझी इच्छा नसल्याचे स्पष्ट करतानाच ‘तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे’, असा सूचक टोला त्यांनी लगावला.

विदेश दौऱ्यावरून परतताच भुजबळ थेट नाशिकला पोहोचले. तिथे ते पत्रकारांशी बोलत होते. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे हे वादात सापडले आहेत. त्यांचे मंत्रिपद काढून तुम्हाला मंत्री करणार अशी चर्चा आहे, यावर ते म्हणाले, कुणाचे मंत्रिपद काढून मला मिळावे, अशी माझी इच्छा नाही. नाराजीनाट्य़ानंतरच्या भेटीत आठ-दहा दिवसांनी बोलू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र त्यात मंत्रिपदाचा विषय नव्हता, असेही ते म्हणाले.