कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील खरेदी विक्रीवर आकारण्यात येणारे बाजार शुल्क (सेस) नको, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. बाजार आवारात आकारण्यात येणाऱ्या सेसला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे उमेदवार, नेत्यांना व्यापाऱ्यांकडून निवेदन देण्याचा निर्णय व्यापारी परिषदेत झाला.
बाजार आवारातील सेस कमी अथवा रद्द करण्याची मागणी राज्यभरातील व्यापाऱ्यांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. याबाबत शासनाने नुकताच आदेश काढत राज्यातील बाजार समित्यांतील सेस एक रुपयांवरून 50 पैशांपर्यंत कमी केला. मात्र, 24 तासांच्या आत अध्यादेश मागे घेतला.