
मध्य रेल्वे उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत 30 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाडय़ा चालवणार आहे. त्यापैकी 24 गाडय़ा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आदिलाबाद मार्गावर धावणार आहेत, तर भिवंडी-सांकराईल आणि खडगपूर-ठाणे यादरम्यान 6 अनारक्षित विशेष गाडय़ा चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेने आतापर्यंत उन्हाळी हंगामात नियमित गाडय़ांव्यतिरिक्त 1228 उन्हाळी विशेष गाडय़ा जाहीर केल्या आहेत. त्यात 290 अनारक्षित गाडय़ा आणि 42 वातानुकूलित उन्हाळी विशेष गाडय़ांचा समावेश आहे.