मध्य रेल्वेवर पाच दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक, लांब पल्ल्याच्या गाड्यांवर होणार परिणाम

मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त मोठा 5 विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 26, 27 जानेवारी आणि 1, 2, 3 फेब्रुवारी रोजी सीएसएमटी ते मस्जिद रेल्वे स्थानकादरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. ब्लॉकदरम्यान मुंबई येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या दादरपर्यंतच चालवण्यात येतील.