माटुंगा ते मुलुंडदरम्यान रेल्वेचा आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत देखभाल व दुरुस्ती कामासाठी ब्लॉक असेल. या काळात लोकल वाहतुकीत बदल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.56 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकात डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तसेच ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.

तसेच ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील. त्यानंतर माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच हार्बरवर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रेदरम्यान अप व डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल.