मध्य रेल्वेची फुकट्या प्रवाशांवर कारवाई; डिसेंबरमध्ये 20.49 कोटींचा दंड वसूल

विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय रेल्वे, मेल, एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी केली. विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. अशा गैरप्रकारांमुळे होणाऱ्या नुकसानीवर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवत आहेत. त्यासाठी तिकीट तपासणी मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे. फुकट्या प्रवाशांवर केलेल्या कारवाईतून मध्य रेल्वेला डिसेंबर 2023 महिन्यात 20.49 कोटींचा महसूल मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे त्यात 2.23 % ची वाढ झाली.

मध्य रेल्वेने केलेल्या कारवाईत मुंबई विभागातून 7.33 कोटी, भुसावळ विभागातून 4.54 कोटी, नागपूर विभागातून 2.94 कोटी, सोलापूर विभागातून 2.58 कोटी, पुणे विभागातून 1.56 कोटी, मुख्यालयातून 1.52 कोटींचा महसूल मिळाला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांना वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.