रेल्वेची आरक्षण प्रणाली चार तास बंद राहणार

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) देखभालीच्या कामासाठी 29 मार्च रोजी रात्री 11.45 वाजल्यापासून ते 30 मार्च रोजी पहाटे 3.45 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या अवधीत आरक्षणासह कोचिंग रिफंड, चार्ंटग क्रियाकलाप, ट्रेन फाइरिंग, आयव्हीआरएस, चालू आरक्षण, चार्ट डिस्प्ले, टच स्क्रीन, रिफंड काऊंटर आणि कोचिंग रिफंड टर्मिनल या सेवा बंद राहतील. तसेच मुंबई पीआरएस गाड्यांसाठी इंटरनेट बुकिंग उपलब्ध नसेल, असे मध्य रेल्वेने कळवले आहे.