मुंबईकरांचा खोळंबा! मध्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक; मेल, एक्सप्रेसच्या मार्गातही बदल

मध्य रेल्वेने रविवारी 7 जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभार दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत अनेक लोकल उशिराने धावणार आहेत, तर काही रद्द करण्यात आल्या असून काहींचा मार्ग बदलण्यात आला आहे. तसेच याचा परिणाम मेल आणि एक्सप्रेसवरही होणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी मेगा ब्लॉकचे संपूर्ण वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करा.

रविवारी सकाळी 10.50 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत मध्य मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. याकाळात उपनगरीय लोकल गाड्यांच्या मार्गात बदल करणअयात आला आहे. BL-13 (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.46 वा.) ते AN-15 (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 2.42 वा.) डाऊन जलद/निम जलद लोकल ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील व त्यांच्या नियोजित वेळेच्या 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

अप जलद/निम जलद लोकल A-26 (कल्याण येथून सकाळी 10.28 वा.) ते BL-40 (कल्याण येथून दुपारी 3.17 वा.) कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबतील. तसेच पुढे ठाणे स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येईल आणि त्यांच्या नियोजित वेळेच्या 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल

पुढील अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या गंतव्यस्थानी 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.

  • ट्रेन क्रमांक 12140 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक 22160 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
  •  ट्रेन क्रमांक 12168 बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक 12321हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
  • ट्रेन क्रमांक 12812 हटिया – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  •  ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  •  ट्रेन क्रमांक 12142 पाटलीपुत्र – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  •  ट्रेन क्रमांक 12294 प्रयागराज – लोकमान्य टिळक टर्मिनस दुरंतो एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक 11080 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक 11060 छपरा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक 12164 चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस
  •  ट्रेन क्रमांक 12162 आग्रा छावणी – लोकमान्य टिळक टर्मिनस लष्कर एक्सप्रेस

डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल

खालील डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या गंतव्यस्थानी 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.

  • ट्रेन क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर एक्सप्रेस
  •  ट्रेन क्रमांक 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस – बलिया कामायनी एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक 13202 लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटणा एक्सप्रेस

मेमू सेवा अर्ध स्थगित

  • मेमू क्रमांक 01339 वसई रोड – दिवा वसई रोड येथून सकाळी 9.50 वाजता सुटणारी कोपर पर्यंत (सकाळी 10.31) धावेल व कोपर ते दिवा स्थानकादरम्यान रद्द राहील.
  • मेमू क्रमांक 01341 वसई रोड-दिवा वसई रोड येथून दुपारी 12.50 वाजता सुटणारी गाडी कोपर पर्यंत (दुपारी 1.37) चालविण्यात येईल व कोपर ते दिवा स्थानकांदरम्यान रद्द राहील.
  •  मेमू क्रमांक 01340 दिवा – वसई रोड कोपर येथून सकाळी 11.45 वाजता सुटेल व वसई रोड येथे दुपारी 12.30 वाजता पोहोचेल व दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान रद्द राहील.
  • मेमू क्रमांक 01342 दिवा – वसई रोड कोपर येथून दुपारी 2.45 वाजता सुटेल व वसई रोड येथे दुपारी 3.25 वाजता पोहोचेल व दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान रद्द राहील.
  •  मेमू क्रमांक 50104 रत्नागिरी – दिवा जलद पॅसेंजर पनवेल येथे स्थगित करण्यात येईल.

हार्बर मार्गावरचे वेळापत्रक

मध्य रेल्वेप्रमाणे हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर हा ब्लॉक असेल. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला आणि पनवेल – वाशी दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या चालवण्यात येतील.

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. डाउन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.18 वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल पनवेल लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.44 वाजता सुटणार आहे. अप हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी 10.5 वाजता पनवेलहून सुटणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी 3.45 वाजता पनवेलहून सुटणार आहे.

पश्चिम मार्गावर रात्रकालीन ब्लॉक

शनिवारी पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल. रात्री 12.15 ते पहाटे 4.15 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. या काळात वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालण्यात येतील.