Mega Block News : मध्य रेल्वेचा 10 दिवसांचा ‘मेगाब्लॉक’, अनेक गाड्या होणार रद्द, चाकरमान्यांना मनस्ताप

मध्य रेल्वे 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान मेगाब्लॉक घेणार आहे. भुसावळ विभागात हा मेगाब्लॉक घेतला जाणार असून या काळात विविध अभियांत्रिकी कामे मार्गी लावली जाणार आहेत. या कामांसाठीच हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना यांचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

10 दिवसांच्या मेगाब्लॉक दरम्यान नागपूर-भुसावळ या मार्गावर धावणाऱ्या 11 गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या तारखांच्या या गाड्या आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

ब्लॉकचे कारण काय?

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सेलू रोड स्थानक येथे ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ कार्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जात आहे. सेलू रोड स्थानक येथे ‘यार्ड रिमोडूलिंग’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ कार्यासाठी ‘प्री नॉन इंटरलॉकिंग’ आणि ‘नॉन इंटरलॉकिंग’ कार्य तसेच तिसरी मार्गिका आणि चौथी मार्गिका, वर्धा-नागपूर दरम्यान ‘लाँग हॉल लूप लाईन’ला ‘कनेक्टिव्हिटी’ प्रदान करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जात आहे.

Train Accident News – रेल्वे अपघाताची मालिका सुरूच, काचंनजंगा एक्सप्रेस घसरली तिथेच मालगाडीचा अपघात

कोणत्या गाड्या रद्द होणार?

  • गाडी क्रमांक 12119 अमरावती -अजनी एक्सप्रेस 1 ते 3, 5, 6, 10 आणि 11 ऑगस्ट रोजीची रद्द.
  • गाडी क्रमांक 12120 अजनी-अमरावती एक्सप्रेस 1 ते 3, 5, 6, 10 आणि 11 ऑगस्ट रोजीची रद्द.
  • गाडी क्रमांक 12159 अमरावती-जबलपूर एक्सप्रेस 4, 5, 9, 10 ऑगस्ट रोजीची रद्द.
  • गाडी क्रमांक 12160 जबलपूर-अमरावती एक्सप्रेस 5, 6, 10 आणि 11 ऑगस्ट रोजीची रद्द.
  • गाडी क्रमांक 22124 अजनी-पुणे हमसफर एक्सप्रेस 6 ऑगस्ट रोजीची रद्द
  • गाडी क्रमांक 22117 पुणे -अमरावती एक्सप्रेस 7 ऑगस्ट रोजीची रद्द
  • गाडी क्रमांक 22141 पुणे-नागपुर हमसफर 8 ऑगस्ट रोजीची रद्द
  • गाडी क्रमांक 22118 अमरावती -पुणे एक्सप्रेस 8 ऑगस्ट रोजीची रद्द
  • गाडी क्रमांक 22142 नागपूर-पुणे हमसफर एक्सप्रेस 9 ऑगस्ट रोजीची रद्द
  • गाडी क्रमांक 22139 पुणे-अजनी हमसफर एक्सप्रेस 10 ऑगस्ट रोजीची रद्द
  • गाडी क्रमांक 22140 अजनी-पुणे हमसफर एक्सप्रेसची 11 ऑगस्ट रोजीची रद्द
  • गाडी क्रमांक 12140 नागपूर-मुंबई एक्सप्रेस 5 ऑगस्ट रोजी नागपूर विभागात 1.45 तास नियमित केली जाईल.