मुंबईच्या पाणी, हवा, कचरा व्यवस्थापनासाठी केंद्राचे पालिकेला 1610 कोटी

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारणे, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनासाठी केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयाने मुंबई महापालिकेला 1 हजार 610 कोटींची मदत दिली आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी 620 कोटी तर पाणीपुरवठा आणि व्यवस्थापनासाठी 990 कोटी रुपये देण्यात आले आहेत. 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ही मदत पालिकेला उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निधीचा वापर रस्त्यांचे रुंदीकरण, वाहतूककाेंडी कमी करण्यासाठीही केला जाणार आहे.

राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार आणि पाठवलेल्या नमुन्याप्रमाणे मुंबईतील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेने हवेचा पृती आराखडा तयार केला आहे. पृती आराखडय़ात रस्त्यांचे रुंदीकरण करणे, अडथळे दूर करून वाहतूककाsंडी कमी करणे, वाहतूक शिस्तबद्ध करणे, अत्याधुनिक वाहतूक प्रणाली विकसित करणे, वांद्रे-कुर्ला संकुल, लोअर परळ इत्यादी विभागातील वाहनांद्वारे उत्सर्जित होणारे हवा प्रदूषण कमी करणे, ध्वनी प्रदूषण नियंत्रित करणे या संबंधातील उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे.

शिवसेना भवन येथे झालेल्या समारंभात शिवसेना नेते दिवाकर रावते आणि शिवसेना नेते खासदार-आयोजक अनिल देसाई यांच्या हस्ते उत्पृष्ट विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, माजी महापौर महादेव देवळे, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर, माजी आमदार प्रकाश फातर्पेकर, माजी नगरसेवक अनिल पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.