
येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या 28 सदस्यीय शिष्टमंडळासोबत केंद्र सरकारची आज बैठक पार पडली. जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. पुढील बैठक 19 मार्च रोजी होईल. आमरण उपोषण करत असलेले शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांना रुग्णवाहिकेने खनौरी सीमेवरून आणण्यात आले. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, प्रल्हाद जोशी आणि पियूष गोयल यांनी डल्लेवाल यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले.
‘बैठक चांगल्या वातावरणात पार पडली. आम्ही शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल आणि सरवन सिंग पंधेर यांचे म्हणणे ऐकले. पुढील बैठक चंदिगडमध्येच होईल. शेतकरी आणि केंद्र सरकारकडेही स्वतःचा डेटा आहे’, असे शिवराज सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.