जगभरातून बातम्यांचा आढावा

केंद्र सरकारने जीएसटी डेटा देणे थांबवले

केंद्र सरकारने जीएसटी डेटा जारी करणे बंद केले आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर सरकार दर महिन्याच्या 1 तारखेला आपला डेटा जारी करत असे. हे काम 74 महिन्यांपासून सुरू होते. मासिक डेटा जारी करणे थांबवण्याचे कोणतेही कारण केंद्राकडून देण्यात आलेले नाही.

सरकारने 1 जुलै 2017 रोजी देशभरात जीएसटी लागू केला. यानंतर पेंद्र आणि राज्य सरकारचे 17 कर आणि 13 उपकर हटवण्यात आले. सरकारने जून महिन्यासाठी जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर केली नाही, परंतु जूनमध्ये जीएसटी संकलन 1.74 लाख कोटींवर पोहोचल्याचे समजते.

अमेरिकेत 8300 कोटींचा घोटाळा

हिंदुस्थानी वंशाचे अब्जाधीश अमेरिकन नागरिक ऋषी शाह याला अमेरिकेच्या न्यायालयाने साडेसात वर्षांची शिक्षा सुनावली. ऋषी शाह ‘आऊटकम हेल्थ’ कंपनीचे सहसंस्थापक आहेत. या पंपनीवर 8300 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे.

इराणमध्ये धावणार हिंदुस्थानी ट्रेन

इराण आणि हिंदुस्थान मिळून इराणमधील चाबहार पोर्टमध्ये रेल्वे महामार्ग तयार करीत आहे. चाबहार पोर्टहून जाहेदान हा 700 किलोमीटरच्या मार्गावर रेल्वे लाइन बनविण्यात येणार आहे. या रेल्वे मार्गामुळे इराणच्या बंदरगाह आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण ट्रान्सपोक्ट कॉरिडोरसाठीचा मार्ग खुला होणार आहे.

अयोध्येत पुजाऱ्यांना ड्रेस कोड, फोनबंदी

अयोध्येतील राम मंदिरातील पुजाऱ्यांसाठी आता नवीन ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र समितीने ड्रेस कोड लागू केला असून या नव्या ड्रेसनुसार आता पुजाऱयांना पारंपरिक भगव्या वस्त्राऐवजी चमकत्या पिवळय़ा रंगाचा कुर्ता आणि धोतर घालावे लागणार आहे. पुजाऱयांना मंदिराच्या गर्भगृहामध्ये स्मार्टपह्नलाही बंदी घातली आहे.

आसाममध्ये पुराचे थैमान

आसाममध्ये अनेक ठिकाणी पूर आला आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. आसामच्या ब्रम्हपुत्रा नदीत 13 मच्छीमार अडकले होते. परंतु हिंदुस्थानी वायूदलाच्या जवानांनी हेलिकॉप्टर नेऊन या सर्व मच्छिमारांना सुरक्षित स्थळी आणत त्यांना वाचवले. राज्य सरकारच्या विनंतीनंतर हिंदुस्थानी वायूदलाच्या जवानांनी ही बचाव मोहीम राबवली. आसाममधील सहा लाखांहून अधिक लोकांना पावसाचा फटका
बसला आहे.

66 लाख व्हॉट्सअॅप अकाऊंट्स बंद

व्हॉट्सअॅपने पुन्हा हिंदुस्थानी युजर्सच्या व्हॉट्सअॅप अकाऊंट्सवर मोठी कारवाई केली आहे. व्हॉट्सअॅपने सुमारे 66 लाखांहून अधिक अकाऊंट्स बंद केली आहेत. यातील 12 लाखांहून अधिक अकाऊंट्स ब्लॉक करण्यात आली आहेत. या 66 लाखांहून अधिक अकाऊंट्सवर मे महिन्यात कारवाई करण्यात आली आहे. एकूण 66 लाख 20 हजार अकाऊंट्स बंद करण्यात आली आहेत.

एलन मस्क-कमला हॅरिस यांच्यात जुंपली

टेस्ला पंपनीचे मालक एलन मस्क आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. कमला
हॅरिस या खोटारडय़ा आहेत, अशा शब्दांत मस्क यांनी कमला यांच्यावर निशाणा साधला. हॅरिस यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल खोटे बोलल्याचा आरोप मस्क यांनी केला. कमला हॅरिस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून डोनाल्ड ट्रम्प हे संपूर्ण देशात गर्भपातावर बंदी घालतील, असे म्हटले होते.

‘वंदे भारत’मध्ये विमानासारखी सुविधा

वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांना विमानासारखा अनुभव देण्यासाठी हिंदुस्थानी रेल्वे सरसावली आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एअर होस्टेस आणि फ्लाईट अटेंडंट तैनात करण्यात आले आहेत. प्रवाशांना फील गुड वाटावे, म्हणून रेल्वेचा हा प्रयत्न आहे. आयआरसीटीसीने वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये सहा महिन्यांच्या ट्रायलवर ही सुविधा सुरू केलेय. त्यासाठी 34 प्रशिक्षित एअर होस्टेस आणि फ्लाईट अटेंडंट ठेवण्यात आले आहेत.