पोर्ट ब्लेअर नव्हे आता ‘श्री विजयपुरम’

केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज एक्सवरून याबाबतची घोषणा केली. त्यानुसार पोर्ट ब्लेअर बंदर हे आता ‘श्री विजयपुरम’ या नावाने ओळखले जाणार आहे. देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. त्यापासून प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव श्री विजयपुरम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.