चित्रपटगृहात आता मुलांवर पालकांचा वॉच

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (सीबीएफसी)  अलीकडेच मुलांसाठी फिल्म रेटिंग सिस्टीममध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार मुलांना आता पालकांच्या देखरेखीखाली चित्रपट पाहता येतील.

सीबीएफसीने यूए श्रेणीमध्ये तीन नवीन रेटिंग श्रेणी जोडल्या आहेत. सीबीएफसी आता नवीन अपडेटअंतर्गत U, UA 7+, UA 13+, UA 16+ आणि U श्रेणीतील चित्रपटांना प्रमाणपत्रे जारी करेल.या नवीन अपडेटवर अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती.

अशी असेल श्रेणी

सर्व चित्रपट एकाच श्रेणीत येणार नाहीत. U श्रेणीतील चित्रपटाला प्रमाणपत्र देणे म्हणजे चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना पाहता येईल. मग ते लहान मुले असोत वा वडील, ते हा चित्रपट पाहू शकतात. UA श्रेणीत तीन उपवर्ग आहेत. UA 7+, दुसरा UA 13+ आणि तिसरा UA 16+ अशा या श्रेणी आहेत.

 UA 13+ श्रेणीत 13 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांना पाहता येतील.

 UA 16+ श्रेणीतील प्रमाणपत्र पालकांना त्यांच्या 16 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी चित्रपट योग्य आहे की नाही हे मार्गदर्शन करेल.

 A श्रेणीत 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे लोक पाहू शकतील.

UA 7+ श्रेणी जर एखादा चित्रपट या श्रेणीत येतो, तर याचा अर्थ 7 वर्षे आणि त्याहून अधिक वयाची मुले तो चित्रपट पाहू शकतात, मात्र त्यांच्या लहान मुलांना हा चित्रपट पाहता येईल की नाही हे पालक ठरवू शकतात. लहान मुलांसाठी पूर्णपणे बंदी घालण्यात येणार नाही, पण वयानुसार थोडी खबरदारी घेतली जाईल.