सेंट्रल बँक ऑफ इंडियाने क्रेडिट ऑफिसर पदांच्या 1 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 30 जानेवारीपासून सुरू झाली असून 20 फेब्रुवारी 2025 रोजी अखेरची तारीख आहे. या भरतीमध्ये अनुसूचित जातीसाठी 150 पदे, एसटीसाठी 75, ओबीसीसाठी 270 पदे, ईव्हीएससाठी 100 पदे आणि सर्वसाधारण वर्गातून 405 पदे भरली जाणार आहेत. या भरतीची सविस्तर माहिती बँकेची अधिकृत वेबसाईट Centralbankofindia.co.in वर देण्यात आली आहे.