हू इज ढसाळ? सेन्सॉर बोर्डा… तुही यत्ता कंची

‘गोलपीठा’, ‘तुही यत्ता कंची’, ‘या सत्तेत जीव रमत नाही’ यांसारख्या कवितासंग्रहांतून शोषितांचे जगणे चितारणारे कवी, दलित पँथरचे संस्थापक आणि ‘पद्मश्री’ नामदेव ढसाळ कोण, असा प्रश्न सेन्सॉर बोर्डाने विचारला आहे. ढसाळ यांच्या भाषेवरच आक्षेप घेत ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाला परवानगी नाकारणाऱया सेन्सॉर बोर्डालाच आता तुही यत्ता कंची, असा प्रश्न विचारला जात आहे.

n ऑगस्ट 2024 पासून बोर्डाच्या वाऱया करत आहोत. बोर्डाने चित्रपटातील ढसाळ यांच्या कवितांवरच आक्षेप घेतला आहे. चित्रपटातील भाषा शिवराळ आहे, असे बोर्डाचे म्हणणे आहे. त्यावर आम्ही ढसाळ यांच्या कार्याचा परिचय करून दिला. तरीही बोर्डाने सहकार्य केलेले नाही, अशी प्रतिक्रिया चित्रपटाचे निर्माते महेश बनसोडे यांनी दिली.