सेलिबी नास कंपनीच्या कामगारांना घसघशीत पगारवाढ, भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश

भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नामांकित अशा सेलिबी नास एअरपोर्ट सर्व्हिसेस (इंडिया) प्रा. लि. कंपनीमधील कामगारांना भरघोस पगारवाढ जाहीर झाली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम यांच्या नेतृत्वाखाली ही पगारवाढ करण्यात आली. 2025-27 या तीन वर्षांकरिता कामगारांना एकूण पगारावर 5 टक्के ते 7.5 टक्के इतकी पगारवाढ करण्यात आली. सदर करारावर व्यवस्थापनातर्फे सीईओ तौसिफ खान, हेड ऑफ ऑपरेशन्स सौरभ दळवी, सीनियर मॅनेजर एचआर ऋतुराज हिरेखान, सिक्युरिटी मॅनेजर पवन शर्मा, डय़ुटी मॅनेजर रमेश राऊत, युनिट अध्यक्ष सुजित कारेकर, उपाध्यक्ष नरेंद्र दळवी, सरचिटणीस सुदर्शन वारसे, खजिनदार संतोष लखमदे, सदस्य हेमंत नाईक, नितीन कदम, रमेश रसाळ, उमेश सुरती, अनिल गुरव यांनी स्वाक्षऱया केल्या. यावेळी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, सहचिटणीस नीलेश ठाणगे, मिलिंद तावडे, विजय शिर्पे, विजय तावडे, कार्यकारिणी सदस्य संजय जाधव, सेलिबी नास असोसिएशनचे हरिश्चंद्र कराळे, रवी शेलार व कामगार उपस्थित होते.
5 लाखांचा मेडिक्लेम मिळणार

पगारवाढीव्यतिरिक्त कामगारांना इतर लाभही मिळणार आहेत. कार्यरत असलेल्या कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला कंपनीच्या सर्व सेक्टरमधील (ऑल इंडिया) कामगारांचे 200 रुपये कापून त्याच्या परिवारास देण्यात येतील, तसेच कंपनीकडूनही एक लाख रुपये देण्यात येतील. निवृत्त होणाया कामगाराला कंपनीकडून दीड लाख रुपये त्याचबरोबर प्रत्येक कामगाराच्या पगारातून 200 रुपये कापून जी काही रक्कम जमा होईल ती त्या कामगारास देण्यात येईल. मेडिक्लेमसाठी पात्र असलेल्या कामगारांना 5 लाखांचा मेडिक्लेम तसेच पाच लाखांच्यावर जो काही खर्च होईल तो सर्व खर्च कंपनी करेल याची लेखी हमी देण्यात आली.