
उपनगरी रेल्वे मार्गावर धावणाया लोकलमध्ये मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवरील 30 लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये 60 सीसीटीव्ही पॅमेरे बसविले आहेत. उर्वरित 115 गाडयांच्या केबिनमध्ये लवकरच सीसीटिव्ही पॅमेरे बसवण्यात येणार आहेत. दरम्यान, याला मोटरमनच्या संघटनेला तीव्र विरोध केला आहे.
पश्चिम रेल्वेवरील मोटरमन, गार्डच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही पॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मोटरमनकडून होणाया चुका आणि त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या स्थानकात थांबा विसरणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, लाल सिग्नल असतानाही गाडी पुढे नेणे अशा घटना वारंवार घडतात. अशा घटनांमागील कारणे शोधता यावीत, यासाठी लोकलमधील मोटरमन आणि गार्ड केबीनच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही पॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मात्र अशाप्रकारे सीसीटीव्ही पॅमेरे लावल्यामुळे गाडी चालवताना आमच्यावर दबाव येऊ शकतो, असा दावा करीत मोटरमन संघटनेने सीसीटीव्ही बसवण्याला तीव्र विरोध केला आहे.