सीबीएसई 10 वीची परीक्षा दोन वेळा घेणार

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ पुढच्या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये  दहावीची परीक्षा दोनवेळा घेणार आहे. मंडळाने आज याबाबतच्या आराखडय़ाला मंजुरी दिली. पहिली परीक्षा 17 जानेवारी ते 6 मार्चदरम्यान होईल तर दुसरी परीक्षा  5 मे ते 20 मेदरम्यान होणार आहे. या निर्णयाचा फायदा 26 लाख विद्यार्थ्यांना मिळणार आहे.