
CBSC बोर्डाने 10 वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. तसेच या बोर्ड परीक्षांसाठी ग्रेडिंग निकषांमध्येही सुधारणा केली आहे, सध्या 9 पॉइंट ग्रेडिंग पद्धती वापरली जात आहे, त्यात गुण ग्रेडमध्ये रूपांतरित केले जातील. तसेच दहावीचे विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा देता येणार आहे. एक परीक्षा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरी एप्रिलमध्ये होणार आहे. शैक्षणिक दर्जा वाढवण्यासह कौशल्य-आधारित शिक्षणाच्या संधींचा विस्तार करण्यासाठी हे बदल करण्यात आले आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन कौशल्य-आधारित विषयांपैकी एकाची निवड करताय येत. त्यात संगणक अनुप्रयोग, माहिती तंत्रज्ञान किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषेच्या विषयांपैकी एक म्हणून इंग्रजी किंवा हिंदी निवडणे आवश्यक आहे. त्याची निवड त्यांना 9 वी किंवा 10वीमध्ये करता येऊ शकते. एखादा विद्यार्थी विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान किंवा भाषा यासारख्या मुख्य विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाला तर ते कौशल्य विषय किंवा पर्यायी भाषा विषयासह तो बदलू शकतात. हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात नवीन भर पडणार आहे. चार नवीन कौशल्य-आधारित पर्यायी विषय सादर करण्यात आले आहेत. त्यात लँड ट्रान्सपोर्टेशन असोसिएट, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, फिजिकल अॅक्टिव्हिटी ट्रेनर आणि डिझाइन थिंकिंग अँड इनोव्हेशन. या सुधारणाचा उद्देश व्यावहारिक आणि व्यावसायिक कौशल्यांवर वाढत्या भराशी जुळवून घेणे आहे.
सुधारित बारावीच्या अभ्यासक्रमात आता भाषा, मानव्यशास्त्र, गणित, विज्ञान, कौशल्य विषय, सामान्य अभ्यास आणि आरोग्य आणि शारीरिक शिक्षण या सात प्रमुख शिक्षण क्षेत्रांचा समावेश आहे. अभ्यासक्रमाच्या अद्ययावतीकरणासह सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या दोन्ही बोर्ड परीक्षांसाठी ग्रेडिंग निकषांमध्येही सुधारणा केली आहे. आता 9-पॉइंट ग्रेडिंग सिस्टमचा वापर केला जात आहे, त्यात गुणांचे ग्रेडमध्ये रूपांतर केले जाईल.