वर्गात नियमित हजेरी नाही; तर 12वीच्या परीक्षेला परवानगी नाही, सीबीएसई बोर्डाचा निर्णय; डमी प्रवेश देणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई

वर्गात नियमित हजेरी न लावणाऱ्या किंवा 75 टक्के हजेरी नसलेल्या विद्यार्थ्यांना 12 वीच्या परीक्षेला परवानगी न देण्याचा निर्णय सीबीएसई अर्थात पेंद्रीय माध्यमिक शिक्षण महामंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर डमी प्रवेश देऊन विद्यार्थ्यांना थेट परीक्षेला बसवणाऱ्या शाळांवरही कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सीबीएसईच्या पथकाने अनेक ठिकाणी शाळांमध्ये अचानक भेट दिली. त्यावेळी अनेक विद्यार्थी शाळांमध्ये येतच नसल्याचे समोर आले. त्यानंतर सीबीएसई बोर्डाच्या बैठकीत अशा विद्यार्थ्यांना 12 वीच्या परीक्षेसाठी परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला. 2025-26 च्या शैक्षणिक वर्षातच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

डमी शाळा म्हणजे काय?

अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी अनेक विद्यार्थी s डमी शाळांमध्ये प्रवेश घेतात. ते थेट परीक्षेला बसतात. संबंधित राज्यातील डमी शाळांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याच राज्यात वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी कोटय़ांतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. त्यामुळे अनेक विद्यार्थी डमी शाळांमध्ये प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे. हे अतिशय गंभीर  आहे.

या विद्यार्थ्यांना मिळणार सवलत

ज्या विद्यार्थ्यांना सीबीएसईकडून 12 वीच्या परीक्षेसाठी परवानगी मिळणार नाही, असे विद्यार्थी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंगची परीक्षा देऊन मग परीक्षेसाठी परवानगी मिळवू शकतात. तसेच वैद्यकीय आणीबाणी किंवा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये सहभाग घेतला असेल किंवा इतर गंभीर कारणांमुळे शाळांमध्ये हजेरी लावता आली नाही, अशा विद्यार्थ्यांना 25 टक्के सवलत देण्यावरही सीबीएसई बोर्डाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.