Pink Lips- मऊ मुलायम गुलाबी ओठांसाठी एरंडेल तेल आहे उत्तम उपाय!

आपण एरंडेल तेलाचा उपयोग केसांसाठी आणि त्वचेसाठी अनेकदा केलेले आहे. एरंडेल तेल हे अनेकजण पिण्यासाठी सुद्धा वापरतात. एरंडेल तेलामध्ये अनेक पोषक गुणधर्म आढळतात. एरंडेल तेलात ओमेगा 6 आणि 9 सारखे निरोगी फॅटस् मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच एरंडेल तेलामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ई देखील असते. व्हिटॅमिन ई शक्तिशाली अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते. इतकेच नाही तर, एरंडेल तेलाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि पोट निरोगी राहते. हे तेल नियमितपणे चेहऱ्यावर लावल्याने अॅलर्जी, पिंपल्स, डाग इत्यादी समस्या दूर राहतात. आपण दररोज ओठांना एरंडेल तेल लावले तर, आपले ओठ मऊ आणि गुलाबी होण्यास मदत होते.

ओठांसाठी एरंडेल तेलाचे फायदे 

 

ओठांवर एरंडेल तेल लावल्यामुळे ओठ मऊ मुलायम होण्यास मदत होते.

 

सिगरेट पिऊन काळे झालेल्या ओठांवर नियमित एरंडेल तेल लावल्यास ओठ गुलाबी होण्यास मदत होते.

 

एरंडेल तेल ओठावरील नाजूक त्वचेसाठी खूपच उपयुक्त मानले जाते.

 

एरंडेल तेलामुळे मृत त्वचा जाते त्यामुळे ओठांना गुलाबी रंग प्राप्त होतो.

 

ओठांना नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ आणि हायड्रेटेड एरंडेल तेल ठेवते.

ओठांवर एरंडेल तेल कसे लावायचे

ओठ निरोगी ठेवण्यासाठी थेट एरंडेल तेल लावू शकता. तुम्हाला फक्त त्याचे 1-2 थेंब घ्यायचे आहेत आणि ते ओठांवर लावायचे आहेत आणि काही मिनिटे मसाज करायचे आहेत. त्यानंतर ते राहू द्या. घराबाहेर पडण्यापूर्वी आणि रात्री झोपण्यापूर्वी हे नियमितपणे करा.

 

बाजारातून एरंडेल तेलापासून बनवलेला लिप बाम खरेदी करू शकता किंवा घरी देखील बनवू शकता. एरंडेल तेलाने लिप बाम बनवणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला एका पॅनमध्ये शिया बटरचा एक छोटा तुकडा ठेवावा लागेल आणि तो गरम करून वितळवावा लागेल. त्यानंतर गॅस बंद करा आणि त्यात 1 चमचा एरंडेल तेल, इतर कोणतेही तेल आणि मध घाला आणि मिक्स करा. तुमचा लिप बाम तयार आहे. हे तुमच्या ओठांवर नियमितपणे लावा आणि नैसर्गिकरित्या गुलाबी ओठ मिळवा.