राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ने सोमवारी जात जातीनिहाण जनगणनेला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. ‘लोकांच्या कल्याणकारी गरजा पूर्ण करण्यासाठी ते उपयुक्त आहे, मात्र याचा वापर निवडणुकीच्या उद्देशांसाठी केला जाऊ नये हे देखील लक्षात घेतले पाहिजे, अशी भूमिका आरएसएसकडून मांडण्यात आली आहे.
आरएसएसचे मुख्य प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी ही भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की,’जातीनिहाय जनगणना हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे समाजाची एकता आणि अखंडता धोक्यात आली आहे. याबाबत पंचपरिवर्तनात चर्चा झाली आहे. आम्ही लोकांमध्ये सामंजस्यासाठी काम करू. जातीवर आधारित प्रतिक्रिया हा आपल्या समाजातील एक संवेदनशील मुद्दा आहे आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्त्वाचा आहे, परंतु जातीनिहाय जनगणनेचा उपयोग प्रचारासाठी आणि निवडणुकीसाठी केला जाऊ नये. परंतु कल्याणकारी हेतूंसाठी आणि विशेषतः दलित समाजाची संख्या जाणून घेण्यासाठी सरकार त्यांची संख्या मोजू शकते’.