‘ससून’च्या अहवालानंतर ‘दीनानाथ’वर गुन्हा

राज्य आरोग्य विभाग, धर्मादाय आयुक्त समिती आणि पालिकेच्या माता-मृत्यू अन्वेषण समितीने तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल सरकारला सादर केला आहे. या अहवालात दीनानाथ  रुग्णालय आणि डॉ. सुश्रृत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. ससून रुग्णालयाच्या समितीचा अहवाल आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.