लाचप्रकरणी पोलीस उपनिरीक्षका विरोधात गुन्हा दाखल

प्रातिनिधिक फोटो

एका गंभीर प्रकरणात गोरेगाव पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाने 9 लाख 90 हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने उपनिरीक्षका विरोधात गुन्हा नोंद केला आहे.तक्रारदार महिला या गोरेगाव येथे राहतात. महिलेचा पैशाचा अपहार केल्याबाबतचा तक्रार अर्ज उपनिरीक्षकाकडे आला होता. तेव्हा उपनिरीक्षकाने महिलेला पोलीस ठाण्यात बोलावले. अर्जदार महिलेने तक्रारदार महिलेविरुद्ध पैशाच्या अपहारासोबत लैंगिक छळवणूक झाल्याबाबत जबाब देत आहे. तिचा जबाब नोंद न करता तिचा तक्रार अर्ज दप्तरी दाखल करण्यासाठी 9 लाख 90 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून पैशाची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने महिलेने एसीबीकडे धाव घेतली होती. महिलेने ऑक्टोबर महिन्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची पडताळणी केली असता उपनिरीक्षकाने हे प्रकरण मिटवायचे असल्यास तक्रारदार महिलेकडे पैशाची मागणी केली. पैशाची मागणी केल्या प्रकरणी एसीबीने गुन्हा नोंद केला.