
विक्रोळीच्या संक्रमण शिबिरातील 11 गाळ्यांच्या वाटपाबाबत आरोप करत एका महिलेने काही दिवसांपूर्वी म्हाडा भवनात नोटा उधळल्या होत्या. याची गंभीर दखल म्हाडाने संबंधित 11 अर्जदारांना पात्रता निश्चितीसाठी गुरुवारी सुनावणी घेतली. मात्र या सुनावणीला अकरापैकी केवळ दोनच अर्जदार उपस्थित राहिले. म्हाडाने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने या दोघांची कागदपत्रे जमा करून घेत त्यांची बाजू ऐकून घेतली. पुढील दोन-तीन दिवसात ही समिती आपला अहवाल म्हाडाच्या उपाध्यक्षांना सादर करणार आहे. सुरुवातीला 27 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली होती. मात्र त्यावेळी एकही अर्जदार उपस्थित न राहिल्यामुळे म्हाडाने या रहिवाशांना आपले म्हणणे मांडण्यासाठी गुरुवारी पुन्हा संधी दिली. मात्र केवळ दोनच अर्जदार या सुनावणीला उपस्थित होते.