दिलीप खेडकर यांना 67 लाखांच्या दंडाची नोटीस

बेकायदा माती उत्खनन केल्याप्रकरणी वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना 67 लाख रुपये दंड वसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे. हा दंड 2022 मध्ये करण्यात आला असून तो न भरल्याने दंड वसुलीची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मुळशी तालुक्यातील धडवली गावामध्ये दिलीप काsंडीबा खेडकर यांची जमीन असून त्यामधून त्यांनी मातीचे मोठय़ा प्रमाणात उत्खनन केले. हे उत्खनन बेकायदा असल्याने सन 2022 मध्ये त्यांना 67 लाख रुपये दंड करण्यात आला. हा दंड न भरल्याने तहसीलदार रणजीत भोसले यांनी त्यांना दंड वसुलीची नोटीस बजावण्यात आली असून तो न भरल्यास संबंधित जमिनीवर राज्य सरकारचे नाव लावले जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया म्हणून या जमिनीचा लिलाव करण्यात येईल.