सनी देओल आणि रणदीप हुडा विरोधात गुन्हा

जाट चित्रपटात ख्रिश्चन समाजाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी या चित्रपटातील अभिनेता सनी देओल आणि रणदीप हुडा यांच्यासह अन्य तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ख्रिश्चन समाजाविरोधात चुकीच्या गोष्टी दाखवल्याचे दृश्य चित्रपटातून वगळण्यात यावे, तसेच चित्रपट निर्मात्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गुड फ्रायडेच्या दिवशी हा चित्रपट मुद्दामहून प्रदर्शित करण्यात आल्याचा दावा तक्रारदार विकलव गोल्ड यांनी केला आहे.