विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळत असतानाच एअर इंडियाच्या विमानात काडतूस सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुबईहून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एअर इंडियाच्या विमानात काडतूस आढळल्याचे शनिवारी उघडकीस आले. याप्रकरणी एअर इंडियाने विमानतळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी AI 916 हे विमान दुबईहून दिल्लीला आले. यावेळी सीटच्या पाकिटात एक काडतूस सापडले. सुदैवाने यात कोणतीही प्रवाशाची हानी झाली नाही. सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
हे काडतूस विमानात कसे आले? कुणी ठेवले? याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. गेल्या महिन्यात 13 दिवसांत इंडियन एअरलाइन्सच्या 300 हून अधिक विमानांना बॉम्बची धमकी मिळाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून बहुतांश धमक्या देण्यात आल्या होत्या.