
वापरलेल्या कारची खरेदी विक्री करण्याचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या ‘कार्स 24’ या कंपनीने देशभरातील विविध स्टोअर्समधून 200 जणांना कामावरून काढून टाकले. कंपनीच्या व्यापक पुनर्रचनेचा भाग म्हणून कर्मचाऱ्यांना कमी करत असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. ‘कार्स 24’चे सीईओ विक्रम चोप्रा ब्लॉग लिहून या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले. कर्मचारी कपात हा कॉस्ट कटिंगचा भाग नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अतिरिक्त कपातीची कोणतीही योजना आखली नसल्याचे त्यांनी सांगितले.