ऑस्कर नामांकन मिळवणारी कार्ला सोफिया गॅस्कोन ठरली पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री

स्पॅनिश अभिनेत्री कार्ला ही पहिली ऑस्कर नामांकन मिळवणारी ट्रान्सजेंडर अभिनेत्री ठरली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘एमिलिया पेरेझ’साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तिला गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 साठी देखील नामांकन मिळाले होते.

‘एमिलिया पेरेझ’ या थ्रिलर चित्रपटाने ऑस्कर 2025 च्या नामांकनांमध्ये वर्चस्व गाजवले. या चित्रपटासाठी कार्ला सोफिया गॅस्कोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले आहे. तसेच कार्लाने 2018 मध्ये तिने लिंग संक्रमणाची घोषणा केली होती. तिच्या जन्माच्या नावावर आत्मचरित्र Karsia: An Extraordinary Story प्रकाशित केले होते. यामध्ये तिने तिचे नवीन नाव कार्ला जाहीर केले आहे. यामध्ये तिने लिंग संक्रमणासंदर्भातील संघर्ष आणि आव्हानांबद्दल सांगितले. कार्लाने अनेक अमेरिकन चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘द नोबल फॅमिली’ या कॉमिक चित्रपटातून कार्ला प्रक्षकांपर्यंत पोहोचली.