गोव्याच्या समुद्रात मालवाहतूक जहाजाला आग

गोव्यातील बेतुलजवळ एमव्ही मार्स्क फ्रँकफर्ट या मालवाहू जहाजाला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. नौवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे.

या जहाजात फिलिपिनो, मॉन्टेनेग्रिन आणि युव्रेनियन नागरिकांसह 21 क्रू सदस्य होते. ते मुंद्रा बंदरातून कोलंबो, श्रीलंकेकडे जात होते. आग लागल्यानंतर जहाज वाहून कर्नाटकजवळील कारवारला पोहोचले. येथे भारतीय तटरक्षक दलाची तीन जहाजे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.