भयंकर! गर्दीत घुसली भरधाव कार, 5 सेकंदात 25 ते 30 जणांना चेंडूसारखं उडवलं; अनेकांचा मृत्यू

कॅनडातील वैंकूवर शहरामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. वैंकूवर येथे स्ट्रीट फेस्टिव्हल दरम्यान भरधाव वेगात आलेली कार गर्दीत घुसले. अवघ्या काही सेकंदामध्ये कारने 25 ते 30 जणांना अक्षरश: चेंडूसारखे उडवले. या दुर्घटनेमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत असून पोलिसांनी कार चालकाचा अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री आठच्या सुमारास झाली. वैंकूवरच्या ई-41 एव्हेन्यू आणि फेजरमध्ये स्ट्रीट फेस्टिव्हल सुरू असून यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रात्री आठच्या सुमारास एक भरधाव कार गर्दीत घुसली आणि अनेकांना चिरडत गेली. या घटनेमुळे घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला. कार चालकाला अटक केली असल्याची माहिती वैंकूवर पोलिसांनी दिली.

दरम्यान, अपघातानंतरची विदारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. कारने उडवल्यानंतर स्ट्रीट फेस्टिव्हल सुरू असलेला रस्ता रक्तामांसाने माखला होता. गंभीर जखमी झालेल्यांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. नागरिकांची धावपळ सुरू असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.