टेक्नोलॉजीच्या जिवावर अवलंबून राहणे चांगले, परंतु कधीकधी ते धोक्याचे ठरते. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. जीपीएसच्या जिवावर भरधाव कार चालवणे तीन मित्रांना भोवले आहे. त्यांची कार थेट अर्धवट पुलावर गेली आणि पूल संपल्यानंतर थेट नदीत पडली. या विचित्र अपघातात कारमधील तिघे जण ठार झाले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील खालपूर दातागंज मार्गावर घडली. या कारमधील तरुण बरेलीहून बदायू जिह्यातील दातागंज येथे एका लग्नसोहळ्याला जात होते. एका बांधकाम अर्धवट असलेल्या पुलावर कार गेली आणि पूल संपल्यानंतर थेट रामगंगा नदीत कोसळली. या दुर्घटनेत कारमधील तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. कारचा चालक नेव्हिगेशन सिस्टिमचा वापर करत होता, असे पोलिसांनी सांगितले.