कार आणि बाईकचा भीषण अपघात, दोन चिमुरड्यांचा जागीच मृत्यू

बिहारमध्ये कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन चिमुरड्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नी आपल्या तीन मुलांसोबत बाईकवरून जात होते. तेव्हा बाघा भागात एका कारने या बाईकला मागून जोरदार धडक दिली. बाईकला धडक दिल्यानंतर कार एका झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात तीन वर्षांचा मनू राम आणि पाच वर्षांचा शिवम राम या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात पती, पत्नी आमि त्यांचा एक मुलगा थोडक्यात बचावला आहे. तिघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृत बालकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

दुसरीकडे अपघातानंतर आरोपी चालक फरार आहे. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून फरार आरोपीच शोध घ्यायला सुरूवात केली आहे.