गूगल मॅपने धोका दिला, कार थेट निर्माणाधीन रस्त्यावर पोहचली; दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले

हल्ली अचूक मार्ग शोधण्यासाठी सर्वजण गूगल मॅपची मदत घेतात. मात्र हेच गूगल मॅप कधी कधी संकटांना आमंत्रण देतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडली आहे. गूगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने कार थेट निर्माणाधीन रस्त्यावर गेली आणि अपघात घडला. मात्र दैव बलवत्तर म्हणून दोघा तरुणांचा जीव वाचला आहे.

मथुरा-बरेली महामार्गावर ही घटना घडली. दोघे तरुण कारने प्रवास करत होते. यावेळी इच्छित स्थळी पोहचण्याचा अचूक रस्ता शोधण्यासाठी त्यांनी गूगल मॅपची मदत घेतली. गूगल मॅपच्या मदतीने ते कार चालवत जात होते. मात्र गूगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवला.

गूगल मॅपने दाखवल्याप्रमाणे तरुण निर्माणाधीन रस्त्यावर कार घेऊन गेले. यामुळे कारला अपघात झाला. मात्र वेळीच कारमधील एअरबॅग्ज उघडल्याने तरुणांचा जीव वाचला आहे. मात्र तरुण यात जखमी झाले असून कारचेही नुकसान झाले आहे. स्थानिकांनी तात्काळ तरुणांना रुग्णालयात दाखल केले.