इंजिनीअरिंग, फार्मसीसह विधी प्रवेशाच्या कॅप राऊंडच्या तारखा जाहीर

उच्च व तंत्रशिक्षण आणि कृषी विभागाच्या अंतर्गत येणाऱया तब्बल 20 हून अधिक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मुख्य प्रवेशासाठी सीईटी सेलकडून कॅप राऊंड प्रक्रिया आणि त्याच्या तारखा सीईटी सेलने जाहीर करण्यात आल्या आहेत. कॅप राऊंडच्या या तारखा तात्पुरत्या असून यात काही बदल होण्याची शक्यताही सीईटी सेलमार्फत स्पष्ट करण्यात आली आहे.

तंत्रशिक्षण संचालनाच्या अंतर्गत येणाऱया इंजिनीअरिंग फार्मसी, बी डिझाईन, एमसीए, एमबीए आदी 12 अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे कॅप राऊंड आणि त्याच्या तात्पुरत्या तारखा सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच दुसऱ्या वर्षातील फार्मसी आणि इंजिनीअरिंग प्रवेशाच्या कॅप राऊंडच्या तारखादेखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱया विधी 3 आणि 5 वर्षांचे निकाल जाहीर करून बराच कालावधी उलटला होता, मात्र त्यासंदर्भातील प्रवेशाचे कॅप राऊंड जाहीर करण्यात आले नसल्याने प्रवेश प्रक्रिया रखडली होती, ती आता लवकरच सुरू होणार आहे. या विभागाच्या अंतर्गत येणाऱया विधी प्रवेशासोबतच बीएस्सी बीएड, बीए बीएड आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचेही कॅप राऊंड आणि त्याचे प्रवेशही होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अभ्यासक्रम तंत्रशिक्षण      कॅप राऊंडच्या तारखा
एमसीए                              6 जुलै
एबीए, एमएमएस                   9 जुलै
एमई, एम. टेक                     9 जुलै
एम.आर्च                            9 जुलै
बीई, बी. टेक                      10 जुलै
बी. फार्मसी, फार्मा डी             11 जुलै
बी. एचएचसीटी                    11 जुलै
बी डिझाईन                        12 जुलै
एम. फार्मा                         13 जुलै
एम. एचएचसीटी                   13 जुलै
द्वितीय वर्षे इंजिनीअरिंग           16 जुलै
द्वितीय वर्षे फार्मसी                16 जुलै

उच्च शिक्षण
एलएचबी-                 5 वर्षे 8 जुलै
बीए, बीएस्सी-            बीएड 8 जुलै
बी.एड-एम.एड           8 जुलै
एलएचबी-                 3 वर्षे 10 जुलै
बीपीएड                   11 जुलै
एमपीएड                  11 जुलै
बी.एड                    12 जुलै
एम.एड                   12 जुलै