राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत 22 उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची 22 उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुसरी यादी जाहीर केली. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती.

एरंडोल ः सतीश अण्णा पाटील, गंगापूर ः सतीश चव्हाण, शहापूर ः पांडुरंग बरोरा, परांडा ः राहुल मोटे, बीड ः संदीप क्षीरसागर, आर्वी ः मयूरा काळे, बागलान दीपिका चव्हाण, येवला ः माणिकराव शिंदे, सिन्नर ः उदय सांगळे, दिंडोरी ः सुनीता चारोस्कर, नाशिक पूर्व ः गणेश गीते, उल्हासनगर ः ओमी कलानी, जुन्नर ः सत्यशील शेरकर, पिंपरी ः सुलक्षणा शीलवंत, खडकवासला ः सचिन दोडके, पर्वती ः अश्विनीताई कदम, अकोले ः अमित भांगरे, अहिल्या नगर शहर ः अभिषेक कळमकर, माळशिरस ः उत्तमराव जानकर, फलटण ः दीपक चव्हाण, चंदगड ः नंदिनीताई भाबुळकर कुपेकर, इचलकरंजी ः मदन कारंडे.