कॅन्सरशी झुंज देत आयुष्याची लढाई जिंकणारे दहा कॅन्सरयोद्धे मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. यात लखनौमधील दोन, दिल्लीतील तीन, कोलकात्यातील एक आणि मुंबईतील चार लढवय्यांचा सहभाग निश्चित झाला आहे. कॅनकिड्स किड्सकॅन, नॅशनल सोसायटी फॉर चेंज फॉर चाइल्डहुड कॅन्सर इन इंडियाअंतर्गत हे मॅरेथॉन धावपटू ‘ड्रीम रन’ विभागात सहभागी होऊन ताकद आणि निश्चयाचे दर्शन घडवतील.
सलग 15 व्या वर्षी कॅनकिड्स किड्सकॅन या प्रतिष्ठत मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन लहान कॅन्सरयोद्धय़ांचे धाडस आणि चिकाटीचा आदर्श घालून देणार आहेत. गेल्या सहा वर्षांत कॅनकिड्स योद्धे नियमितपणे या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत.
‘सर्व्हायव्हर्स या मिशनच्या पेंद्रस्थानी आहेत,’ असे कॅनकिड्सच्या संस्थापक-अध्यक्ष आणि स्वतःहीकॅन्सर सर्व्हायव्हर असलेल्या पूनम बगाई म्हणाल्या. ‘टाटा मुंबई मॅरेथॉनमधील त्यांचा सहभाग कर्करोगावर मात करण्यासाठी लागणारी ताकद, आशा, निश्चयाचे प्रतीक आहे. ते केवळ सर्व्हायव्हर्स नाहीत, तर सर्वांना प्रेरणा देणारे योद्धे आहेत.’ टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 मध्ये सहभागी होणार असलेल्या योद्धय़ांमध्ये वारासणीतला उदयोन्मुख क्रिकेटपटू सुमित गुप्ताला वयाच्या सहाव्या वर्षी क्षयरोग आणि अकराव्या वर्षी हॉजकिन्स लिम्पह्माचे (स्टेज 3) निदान झाल्यानंतर सुमितने शस्त्रक्रिया, केमोथेरपी पार पाडत सक्रिय राहिला व क्रिकेटचा ध्यास सुरूच ठेवला.
त्याशिवाय 21 वर्षांचा अतुल सिंग राठोड का रेटिनोब्लास्टोमाचा सर्व्हायव्हर आहे. वयाच्या फक्त दुसऱया वर्षी डोळय़ांचा कर्करोग झाल्यानंतर अतुलला त्याच्या आईने जबरदस्त पाठिंबा आणि एम्समध्ये दर्जेदार उपचार मिळवून दिले. जर्म सेल टय़ुमर सर्व्हायव्हर सुगंधा कुमारी आता उत्तर प्रदेशातील 200 कॅन्सर सर्व्हायव्हर्सचे प्रतिनिधित्व करत असून ती कर्करोग झालेल्या मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे व निधी गोळा करण्याचे काम करत आहे. या मुलांबरोबरच 175 कॅनकिड्स सपोर्टर्स, इतर रनर्स, ज्येष्ठ नागरिक धावणार आहेत. या गटामध्ये 100 हाफ मॅरेथॉन पूर्ण केलेल्या विद्या या मॅरेथॉन रनर सहभागी होणार आहोत.