कॅनरा बँकेकडून एफडी व्याजदरात कपात

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात करण्यात आल्यानंतर बँकांनीही मुदत ठेवी म्हणजेच एफडीवरील व्याज दर कमी करण्यास सुरुवात केलीय. कॅनरा बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदरात 20 पॉइंट्सने कपात केली आहे. याआधी कोटक महिंद्रा बँकेने एफडी व्याजदरात कपात केली होती. कॅनरा बँकेत 1 वर्षासाठी एफडी करणाऱ्यास वार्षिक 6.85 टक्के दराने व्याज मिळेल तर 2 वर्षांच्या एफडीवर 7.15 टक्के, 3 वर्षांच्या एफडीवर 7.20 टक्के आणि 5 वर्षांच्या एफडीवर 6.70 टक्के व्याज दिले जाईल. बँक 444 दिवसांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे.