कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. सरकारबद्दल वाढलेल्या असंतोषामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 26 डिसेंबर 2024 रोजी अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रिलँड यांनी राजीनामा दिला होता. संसदेचे अधिवेशन 27 जानेवारीपासून प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र आता टडो यांच्या राजीनाम्यामुळे 24 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले असल्याची माहिती सरकारी अधिकाऱयाने दिली.
जस्टिन ट्रुडो हे 2013 पासून लिबरल पक्षाचे नेतृत्व करत आहेत. 2015 मध्ये कंजर्वेटिव पक्षाचे सरकार कोसळल्यानंतर ट्रुडो पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. मागील दहा वर्षे या पदावर राहिलेले टडो सुरुवातीच्या काळात लोकप्रिय नेते म्हणून चर्चेत राहिले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते टीकाकारांच्या निशाण्यावर आहेत.